जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, परकंदी इयत्ता तिसरी
प्र. १) खालील संवाद वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही.
आजोबा आणि नातू यांच्यातील संवाद
आजोबा : अरे वा! श्रेयस, तू आज लवकर उठलास? काय करतोयस?
श्रेयस : हो आजोबा. आज शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. मी त्यासाठी चित्र काढतोय.
आजोबा : छान! तू कशाचं चित्र काढणार आहेस?
श्रेयस : आजोबा, मी एका सुंदर बागेचं चित्र काढणार आहे. त्यात रंगीबेरंगी फुलं आणि फुलपाखरं असतील.
आजोबा : खूपच सुंदर कल्पना आहे! तुला रंग भरायला आवडतात ना?
श्रेयस : हो आजोबा! मला तर चित्र काढायला आणि रंग भरायला खूप आवडतं.
आजोबा : शाब्बास! मन लावून चित्र काढ. तुला नक्कीच बक्षीस मिळेल.
प्र. २) खालील बातमीचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही.
मुंबई, दि. २ ऑक्टोबर : शहरात आज महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित नाटके सादर केली. प्रमुख कार्यक्रम गांधी उद्यानात झाला, जिथे अनेक मान्यवरांनी महात्मा गांधींच्या विचारांवर भाषणे दिली. शहरात शांतता आणि सद्भावना रॅली काढण्यात आली होती.
प्र. ३) खालील उताऱ्यात योग्य ठिकाणी कंसातील नाम व सर्वनाम ओळखून रिकाम्या जागी लिहा.
(ती, सायकल, आम्ही)प्र. ४) खालील सूचनाफलक वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
आपले आरोग्य, आपली जबाबदारी : सूचनाफलक
१) कचरा नेहमी कचरापेटीत टाका.
२) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
३) पिण्याचे पाणी जपून वापरा.
४) आजारी असल्यास घरीच आराम करा.
--------------- बँक व्यवस्थापन
- रमेश बँकेतील कर्मचाऱ्यांशी मोठ्या आवाजात बोलत होता.
- सायलीने बँकेत तिचे बचत खाते उघडले.
- जॉनला बँकेत एक अनोळखी व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना दिसली आणि त्याने सुरक्षा रक्षकाला सांगितले.
No comments:
Post a Comment