Wednesday, 16 April 2025

Home Work Std 2 16 April 2025

इयत्ता दुसरी - गृहपाठ

इयत्ता दुसरी - गृहपाठ

प्रश्न: १. परिच्छेद वाचा व उत्तरे लिहा

माझ्या शाळेच्या समोर एक मोठे मैदान आहे. त्या मैदानात विविध रंगांची फुले फुललेली आहेत. मला तिथे खेळायला खूप आवडते. मी माझ्या मित्रांबरोबर धावतो आणि पकडापकडी खेळतो. कधी कधी आम्ही पतंग उडवतो. मैदानाच्या एका बाजूला मोठे वडाचे झाड आहे, त्याच्या सावलीत बसून आम्हाला खूप शांत वाटते.

१. शाळेच्या समोर काय आहे?
२. मैदानात कशाची फुले फुललेली आहेत?
३. मुलांना मैदानात खेळायला काय आवडते?
४. मैदानाच्या एका बाजूला कोणते झाड आहे?
५. "आम्ही पतंग उडवतो" या वाक्यातील 'आम्ही' कोणासाठी वापरले आहे?
६. तुम्हाला खेळायला आवडणारे कोणतेही दोन खेळ लिहा.

प्रश्न २ पुढील इंग्रजी वाक्ये वाचा. त्यातील वस्तूंची (Things/Objects) नावे लिहा.

  1. I have a red ball.
  2. Look at the blue sky and white clouds.
  3. She is reading a story book.
  4. The yellow sun is shining brightly.
  5. My mother uses a sharp knife in the kitchen.
  6. He is sitting on a wooden chair.
  7. I write with a blue pen in my notebook.
  8. There is a green tree outside my window.
  9. She drinks water from a glass cup.
  10. We eat sweet mangoes in the summer.

प्रश्न ३ शाब्दिक उदाहरणे

१. एका बागेत ६४ फुलपाखरे होती आणि आणखी ४९ फुलपाखरे आली, तर आता बागेत एकूण किती फुलपाखरे आहेत?
२. एका माळेत छत्तीस मणी होते. त्यातून नऊ मणी काढले, तर माळेत आता किती मणी शिल्लक आहेत?

No comments:

Post a Comment